महाराष्ट्र

राज्यात आज 67, 752 रुग्ण कोरोनामुक्त तर 66,358 जणांना कोरोनाची बाधा

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के

27 April :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज 66 हजार 358 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात आज 895 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचं समोर येऊ लागलं आहे.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

आज 67 हजार 752 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 36 लाख 69 हजार 548 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के झाले आहे. राज्यात आज 895 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.05 टक्के एवढा आहे.