श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यास सर्वोप्रथम हे करा
रुग्णालयात येण्याचीही नाही गरज
27 April :- कोरोना व्हायरसच्या प्रसारानं संपूर्ण जगभरात कहर केला आहे. ऑक्सिजनची कमतरता, बेड्सचा तुटवडा, रेमडेसिविरची टंचाई यांमुळे संपूर्ण जगभरात ताण तणावपूर्ण वातावरण आहे. अशा स्थितीत हेल्थ एक्सपर्ट्सनी लोकांना घरीच रिकव्हर होण्याचा सल्ला दिला आहे.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार श्वास घ्यायला त्रास झाल्यास सगळ्यांनी रुग्णालयात येण्याची काहीही गरज नाही. ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन लेव्हल सतत ९० च्या खाली जात असेल तेव्हाच रुग्णालयात जायला हवं. या व्यतिरिक्त श्वास घ्यायला त्रास होत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. एका रिपोर्टनुसार शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासल्यास गॅस, स्टोव्ह, मेणबत्ती, फायरप्लेस, गॅस हीटर अशा वस्तूंपासून जवळपास ५ फूट अंतर ठेवायला हवं.कारण ज्वलनशील वस्तूंच्या जवळ गेल्यास त्रास अधिक वाढण्याचा धोका असतो. पेंट थिनर, एरयोसोल स्प्रे, क्निनिंग फ्डूल यांसारख्या ज्वनलशिल पदार्थांचा उपयोग करू नये. याशिवाय पेट्रोलियम, ऑईल, ग्रीस बेस्ड क्रिम किंवा वॅसलिन कोणतंही प्रोडक्ट छातीच्या कोणत्याही भागावर लावू नये.
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
श्वास घ्यायला त्रास होत असेल तर धुम्रपान करू नये. सिगारेट बीडी पीत असलेल्यांपासून लांब राहावे. इतकंच नाही तर सुगंधित अगरबत्ती किंवा धूप याचा वापर टाळावा. ऑक्सिजन कॉन्सनटेटर्सचा वापर करत असाल तर खिडक्या, दरवाजे उघडे असायला हवेत. ताजी हवा मिळाल्यानंतर कॉन्सनटेटर्स आपलं काम अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतील.जर होम क्वारंटाईन असाल तर जास्तीत जास्त झाडांजवळ राहण्याचा प्रयत्न करा. असं केल्यानं तुम्ही नेहमी फ्रेश राहाल. एका माहितीनुसार काही खास व्यायाम प्रकार आपली श्वसन क्षमता चांगली बनवण्यासाठी प्रभावी ठरतात. म्हणून तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रोज व्यायाम करायला हवेत. स्वतःला डिहायड्रेट होऊ देऊ नका, जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशन केल्यास उत्तम ठरेल. त्यामुळे ताण तणाव कमी होण्यास मदत होईल. ताज्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. ऑक्सिजन सॅच्यूरेशन काय आहे? ऑक्सिजन सॅच्यूरेशन फुस्फुस आणि इतर शरीराला जाणारं रक्तातील हिमोग्लोबिन पातळी वाढवतं.
शरीरातील यंत्रणा सुरळीत करण्यासाठी मदत करतं. रिडिंगमध्ये ९४ पेक्षा जास्त पातळी असणारे धोक्याचे बाहेर असतात. कोरोना झाल्यानंतर शरीरातील ऑक्सिजन पातळी वेगाने कमी होते.तज्ज्ञांच्या मते, SpO2 पातळी ९४ ते १०० मध्ये असणं हे निरोगी असण्याचे संकेत आहेत. तर ९४ च्या खाली गेल्यास ते हायपोस्केमिया ट्रिगर करू शकतं. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. जर ऑक्सिजनची पातळी ९० च्या खाली गेली तर धोक्याची घंटा आहे. तुम्हाला तातडीनं उपचाराची गरज भासेल.इंटेसिव ऑक्सिजन सपोर्ट – श्वास घेण्यास अडचण, छातीत दुखणे हे शरीरातील ऑक्सिजन खालावण्याचे संकेत आहेत. काही रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालवल्याने त्यांना रेस्पिरेटरी इंफेक्शनचा त्रास होतो. शरीराती ऑक्सिजनचा कमतरता आणि श्वास घेण्यास अडचण योग्य पद्धतीने थांबवू शकतो. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही. रुग्णांची अवस्था गंभीर असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्येच घेऊन जावं लागेल जर तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९५ च्या वर असेल तर घाबरण्याची गरज नाही. जर ऑक्सिजन पातळी ९१-९४ मध्ये असेल तर शरीराकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर ऑक्सिजन पातळी १-२ तास सलग ९१ च्या खाली जात असेल तर तात्काळ उपचारांची गरज आहे.
कोरोना व्हायरसच्या सामान्य लक्षणांबाबत सगळेच जागरूक आहेत. परंतु यात काही अशी लक्षणं आहेत जे लोकांच्या नजरेस येत नाहीत. चेहऱ्यांवरील रंग उडणे, होठांवर निळेपणा, रक्तात ऑक्सिजन कमी होण्याचे प्रमाण, हेल्दी ऑक्सिजेनेटेड ब्लडमुळे आपली त्वचा लाल अथवा गुलाबी रंगाशी जुळते. कोरोना रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक खालावते. त्यावेळी छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास आणि वारंवार खोकल, अस्वस्थपणा, डोकेदुखी अशी लक्षणं आहेत. अशावेळी तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल होणं गरजेचे आहे.