बीड

बीड कोरोना ब्रेकिंग; आजही कोरोनाबाधितांचा आकडा मोठा

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

27 April :- बीड जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यानही कोरोनाचा आलेख घसरणीला यायचं नाव घेत नाहीये. दर दिवसाला जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. बीड, अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात बाधितांचा आकडा हजाराच्या पुढे रोज वाढतांना दिसून येत आहे.

झुंजारनेता वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रूप

काल जिल्ह्यातून 4 हजार 397 संशयितांचे स्टॅब तपासणीसाठी पाठवले असता आज दुपारी 4 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 3 हजार 100 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले तर 1 हजार 297 जण कोरोना बाधित आढळून आले. सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात 206, आष्टी 138, बीड 313, धारूर 52, गेवराई 84, केज 171, माजलगाव 44, परळी 85, पाटोदा 77, शिरूर 82, वडवणी तालुक्यता 45 बाधितांचा समावेश आहे. आज बीड, अंबाजोगाई, केज, आष्टी या ठिकाणी सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत..