भारत

प्रसिद्ध गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनामुळे निधन

दिल्लीतील सेंट स्टीफंस हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते भरती

25April :- बनारस घराण्याचे प्रसिद्ध गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे निधन झाले आहे. त्यांना गंभीर अवस्थेत दिल्लीतील सेंट स्टीफंस हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. राजन मिश्रा यांना कोरोनाची लागण झाली होती. यातच त्यांना ह्रदयविकाराच झटका आल्याचे सांगितले जात आहे.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

राजन मिश्रा आणि त्यांचे भाऊ साजन मिश्रा ख्याल शैलीतील गायनासाठी लोकप्रिय होते. या जोडीला 1971 मध्ये भारत सरकारने संस्कृत पुरस्काराने सन्मानित केले होते. यानंतर 1994-95 मध्ये गंधर्व सन्मान, 1998 मध्ये संगीत नाटक अकादमी आणि 2007 पदम्भूषणने सन्मानित करण्यात आले होते. 14 डिसेंबर 2012 ला त्यांना राष्ट्रीय तानसेन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांचे आतापर्यंत 20 पेक्षा जास्त अल्बन आले आहेत.