महाराष्ट्र

आनंदाची बातमी! राज्यात नागरिकांचे होणार मोफत लसीकरण

राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा

25 April :- राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्ण वाढीचे रोज नवे विक्रम नोंदवले जात आहे. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकार 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार आहे. राज्यातील वाढता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून 1 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले आहे.

झुंजारनेता वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रूप

दरम्यान सरकारकडून कठोर निर्बंधही लादले जात आहेत. यासोबतच लसीकरण मोहिमेवरही ठाकरे सरकारने लक्ष केंदीत केले आहे. 1 मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्याने शनिवारी घेतला. यानंतर आता रविवारी राज्य सरकारने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.