कोरोनामुळे मृत पावलेल्या ३० रुग्णांवर अंबाजोगाईत अंत्यसंस्कार
अंबाजोगाईमध्ये एप्रिल महिन्यात चार हजारांपेक्षा ज्यास्त रुग्ण
25 April :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालला आहे तर आंबाजोगाई तालुक्याची परिस्थिती भयाव दिसून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांची संख्याही वाढत असल्याने भयावह परिस्थिती आहे. शनिवार व रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या ३० रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. २८ जणांना अग्नीडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला.
झुंजारनेता वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रूप
दिवसेंदिवस कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालल्याने भय इथले संपत नाही, अशीच स्थिती झाली आहे.दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. बीड जिल्ह्यात दररोज हजारांपेक्षाही अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अंबाजोगाई तालुक्यात फक्त एप्रिल महिन्यात चार हजारांपेक्षा ज्यास्त रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.