News

बालविवाहाच्या दोन घटना ; गुन्हा दाखल

पाथर्डी ( प्रतिनिधी ) तालुक्यातील भारजवाडी येथे अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. यातील एक मुलगी सतरा वर्ष अकरा महिने वयाची  तर दुसरीचे 16 वर्ष वयाची आहे. पोलीस कॉन्स्टेबल अरुण शेकडे यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलींचे आई ,वडील ,भाऊ ,नवरदेव नवरदेवाची आई वडील अशा एकूण दहा जणांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुकातील भारजवाडी येथे 24 मे रोजी दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ भारजवाडी येथे जावून चौकशी केली असता दोन मुलींचा बालविवाह झाला असल्याची बाब समोर आली. याबाबद पोलिसांनी एका घटनेत मुलीचे वडील बाबासाहेब बापु शेकडे,आई आशाबाई बाबासाहेब शेकडे, रा.भारजवाडी, मुलाचे वडील प्रकाश बेळगे ,मुलाची आई (नाव माहीत नाही) ,नवरदेव मुलगा रोहीत प्रकाश बेळगे रा.आवडी,ता.पैठण, औरंगाबादतर दुसऱ्या घटनेत  मुलीचे वडील सुभाष बापु शेकडे ,आई उषा सुभाष शेकडे,भाऊ राम सुभाष शेकडे ,मुलाचे वडील भास्कर रामकिसण बटुळे,आई(नाव माहीत नाही), रा.भारजवाडी यांच्यावर बाल विवाह  प्रतिबंधक अधिनियम तसेच कोव्हीड 19 चे कलम व साथ रोग,आपत्ती व्यवस्थापन कायदा प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पहिल्या बाल विवाहाच्या घटनेत मुलीचे वय १७ वर्ष ११ महिने होते तर दुसऱ्या बाल विवाहाच्या घटनेत मुलीचे वय १६ वर्ष असून या दोन्ही घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करत आहे.