महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा कहर कायम; आजही रुग्णवाढ चिंताजनक

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा

24 April :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज 67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 63 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के झाले आहे.

झुंजारनेता वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रूप

राज्यात आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.मुंबई गेल्या 24 तासात 5867 कोरोना बाधित रुग्णांची नोंद मुंबईत गेल्या 24 तासात 5867 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 29 हजार 817 वर पोहोचली आहे. सध्या 78 हजार 226 एकूण सक्रिय रुग्ण आहेत.