भारत

पतीला वाचवण्यासाठी तिचा केविलवाणा प्रयत्न असफल; बेड मिळेना म्हणून ती देत होती पतीला आपल्या तोंडाने श्वास

अखेर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं

24 April :- कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने मोठी हानी होत आहे. या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यासोबतच काही कुटुंबच्या कुंटुंब कोरोनाने खाल्ली आहेत. कोरोना वाढत आहे तर दुसरीकडे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशाचप्रकारे एक महिला आपल्या पतील दवाखान्यात घेऊन जाताना ती आपल्या तोंडाने श्वास देत होती.आपल्या पतीला वाचवण्यासाठीचा या महिलेने केविलवाणा प्रयत्न केला. ती आपल्या पतीला रिक्षातून श्रीराम हॉस्पिटल, साकेत हॉस्पिटल आणि केजी नर्सिंग होममध्ये गेली होती. मात्र तिथे तिला बेड उपलब्ध नव्हता त्यामुळे त्यांना तिथे दाखल करून घेतलं नाही. त्यानंतर तिने आपल्या पतीला एसएस मेडिकल कॉलेजमध्ये आणलं.

रस्त्यामध्ये येताना पतीला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून ती आपल्या तोंडाने श्वास देत होती. रेणू सिंघल असं संबंधित महिलेचं नाव असून तिच्या पतीचं नाव रवि सिंघल असं आहे.एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचल्यालर रवि सिंघल यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. रेणू यांना यावर आधी विश्वास बसला नाही. पण त्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. विकास सेक्टर सातमध्ये सिंघल वास्तव्यास होते. आग्र्यामधील ही हृदयद्रावक घटना समोर आली.