बीड

बीड जिल्ह्यात ‘इतक्या’ रुग्णांना झाली कोरोनाची बाधा

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा

23 April :- दररोज बीड जिल्ह्यामध्ये 1000 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा येत आहे. तपासणीच्या 25 टक्के रूग्ण हे पॉझिटिव्ह निघू लागले. एकूण 4398 संशयीतांचे तपासणी केली होती. त्यामध्ये 1195 जण पॉझिटिव्ह तर 3203 निगेटिव्ह आले आहेत.


कोरोना रूग्णांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. दररोज जिल्ह्यात हजारापेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह निघू लागले. तपासणी केलेल्या एकूण रूग्णांपैकी 25 टक्के आकडा पॉझिटिव्हचा निघू लागला. आज आलेल्या अहवालात 1195 जण पॉझिटिव्ह तर 3203 निगेटिव्ह आले.

एकूण 4398 जणांचे स्वॅब तपासण्यात आले होते. अंबाजोगाईमध्ये 194, आष्टी 201, बीड 208, धारूर 50, गेवराई 124, केज 130, माजलगाव 59, परळी 72, पाटोदा 65, शिरूर 58 आणि वडवणी 34 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.