बीड

नामलागाव येथील ऑइल मिलला भीषण आग!

लाखों रुपयांचे नुकसान

24 April :- बीड तालुक्यातील नामलागाव रोडवरील पीएस ऑईल इंडस्ट्रीज मिल ला शॉटसर्किट झाल्याने आज सकाळी 24 एप्रिल रोजी आग लागली. या आगीत पेंड, सरकी व मशिनरी जाळून खाक झाल्या आहेत. अंदाजे 90 लाखाच्या जवळ नुकसान झाले असल्याची माहिती मिलचे मालक यांनी दिली. अजय घोडके व श्यामसुंदर चरखा अशी मालकाची नावे आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आली आहे.

झुंजारनेता वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रूप