बीड

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश! बँक कामकाजासाठी केवळ २ तासाचा वेळ

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

23 April :- राज्यात लावलेल्या कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बँकांच्या कामकाजासाठी आता केवळ २ तासाचा वेळ देण्यात आला आहे. आता बँका आणि बँकांच्या ग्राहक सेवा केंद्रांचे व्यवहार केवळ सकाळी १० ते १२ याच वेळेत चालतील असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.