बीड

बीड कोरोनाच्या विळख्यात; आजची रुग्णवाढ धाकधूक वाढवणारी!

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

23 April :- कोरोना विषाणूचा कहर बीड जिल्ह्यात आटोक्यात येत नसून दिवसेंदिवस वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी सातशे नंतर हजार आणि आता गेल्या 3-4 दिवसांपासून तर दररोज 1200 पेक्षा अधिक रुग्णांची भर पडू लागली आहे आणि विशेष म्हणजे ही रुग्णसंख्या लॉकडाऊन असताना वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकाअधिक काळजी घेऊन स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा कोरोना संक्रमणापासून बचाव करणे गरजेचे आहे.

झुंजारनेता वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

आरोग्य विभागाला आज 23 एप्रिल रोजी 3971 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 1210 जण बाधित आढळून आले असून 2761 जण निगेटिव्ह आले आहेत.आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई 234 आष्टी 165 बीड 227 धारूर 49 गेवराई 87 केज 129 माजलगाव 57 परळी 107 पाटोदा 88 शिरूर 31 तर वडवणी येथे 36 रुग्ण आढळले आहेत.

गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख ९४ हजार ८४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६२ हजार ४७९ जणांचा मृत्यू झाला आहे.