महाराष्ट्र

डॉक्टरांवर जीवघेणा चाकू हल्ला

रुग्णाच्या नातेवाईकाला राग अनावर

22 April :- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे डॉक्टर कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर हल्ले होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. नांदेडमध्ये एका रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांवर हल्ला केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात विविध रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याच रुग्णालयात २१ एप्रिल रोजी डॉक्टरांवर जीवघेणा चाकू हल्ला झाला आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

या डॉक्टराने रुग्णाच्या नातेवाईकांना मोठ्याने बोलू नका. त्यामुळे इतरांना त्रास होतो, अशी सूचना दिली होती. मात्र त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकाला राग अनावर झाला. तो नातेवाईक बाजूला असलेला चाकू घेऊन डॉक्टरांच्या दिशेने धावत गेला. मात्र त्याचवेळी उपस्थितीतांनी त्याला अडवल्याने अनुचित प्रकार टळला. ही सर्व घटना एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच हा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. दरम्यान या प्रकारानंतर संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब गायकवाड असे या आरोपीचे नाव आहे. सध्या त्याला पोलिसांनी अटक केली आहे.