बीड

कोरोनाच्या मीटरचा वेग कायम; आजही रुग्णसंख्येत मोठी भर

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

22 April :- बीड जिल्ह्यात कोरोनाचे संकट दरदिवशी गडद होत चालले आहे. कोरोनाने बीड जिल्ह्याला चांगलाच फास आवळला आहे तरी बीडकरांना मात्र कोरोनाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर नागरिकांची जमा होणारी गर्दी तर गल्लो-गल्लीमध्ये जमत असलेला माणसांचा घोळका येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकते. आजही बीड जिल्ह्यात तब्बल 1 हजार 145 नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले असून अंबाजोगाई, बीड या दोन तालुक्यात रुग्णांची संख्या दोनशेच्या पार आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

काल 21 एप्रिल रोजी जिल्हाभरातून 4 हजार 490 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता त्या नमुन्यांचा अहवाल आज दुपारी साडेतीन वाजता प्राप्त झाला असून यामध्ये 3 हजार 545 संशयितांचे स्वॅब निगेटिव्ह आले तर तर 1 हजार 145 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. अंबाजोगाई अणि बीड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आजही 200 च्या पार आहे. अंबाजोगाईत 205, आष्टी 138, बीड 226, धारूर 43, गेवराई 116, केज 119, माजलगाव 65, परळी 77, पाटोदा 91, शिरूर 33 तर वडवणी तालुक्यात 32 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.