राज्यात उद्या रात्रीपासून ‘कडक’ लॉकडाऊन
राज्य सरकारकडून नियमावली जाहीर
21 April :- राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्य सरकारकडून आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. या नुसार, अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. पण, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येतील. तसेच, लग्नात 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
नियमांचे उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. या नियमांमध्ये जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आला असून, खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तर, मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय.