महाराष्ट्र

राज्यातील कोरोनास्थिती चिंताजनक; गेल्या 24 तासांत 568 जणांचा मृत्यू

आतापर्यंत 61 हजार 911 जणांचा मृत्यू

21 April :- राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊनची तयारी सुरु केलीय. त्याबाबतचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांकडून दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधून लॉकडाऊनबाबत माहिती देणार होते. मात्र, नाशिकच्या दुर्घटनेनंतर मुख्य सचिवांकडून लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. अशावेळी राज्यातील कोरोनास्थिती अधित चिंताजनक बनल्याचं आजच्या आकडेवारीवरुन पाहायला मिळत आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

गेल्या 24 तासांत राज्यात 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल 67 हजार 468 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज 54 हजार 985 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 लाख 27 हजार 827 वर पोहोचला आहे. त्यातील 32 लाख 68 हजार 449 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 61 हजार 911 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6 लाख 95 हजार 747 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील मृत्यूदर 1.54 टक्क्यांवर पोहोचला असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 81.15 टक्के इतका आहे.