बीड

मृत्यूतांड्व! जिल्ह्यात आज 11 रुग्णांचा मृत्यू

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

21 Apriul :- बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु असून आता कोरोना बाधितांच्या वाढत्या आकड्यासह कोरोनामुळे मृत पावत असलेल्यांचीही संख्या वाढू लागली आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत असून रुग्णांच्या मृत्यूने प्रशासन हैराण झाले आहे. जिल्हा रुग्णालयासह सर्वच कोविड केयर सेंटर हाऊसफुल आहेत.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

अंबाजोगाई येथील एस आर टी रुग्णालयात दाखल असलेल्या नऊ आणि तपासणीसाठी आलेल्या दोन रुग्णांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास खंडित झाल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. नाशिकच्या दुर्दैवी घटनेनंतर या दुर्घटनेने हळहळ व्यक्त केली जातेय.

ऑक्सिजन अभावी जिल्ह्यातील परिस्थितीत गंभीर होऊ लागली, असताना परळी पाठोपाठ आता अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात देखील ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याचं समोर आलं आहे. रुग्णालयातील 2 आणि 3 वार्डात ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय. माञ रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले असून यातील रुग्णांचे वय आणि उशीरा रुग्णालयात दाखल केल्यानं मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठता शिवाजी सुक्रे यांनी दिलीय.