महाराष्ट्र

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू

मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर

नाशिकच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने उपचार घेणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर आहेत. सुरुवातीला 11 जणांच्या मृत्यूचे वृत्त आले होते, अवघ्या काही मिनिटांत मृतांचा आकडा दुपटीने वाढला. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 13 केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक लावण्यात आला आहे. हाच टँक बुधवारी लीक झाला. या घटनेनंतर काही वेळातच ऑक्सिजनच्या टँकची दुरुस्ती करण्यात आली.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

रुग्णालयात 131 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर अत्यवस्थ रुग्ण 15 व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय असून सुमारे दीडशे रुग्ण येथे दाखल आहेत. या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, घटनेतील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले आहे.