बीड

डोक्यात हत्याराने वार करून भावाने केला बहिणीचा खून

केजमधील धक्कादायक घटना!

21 April :- बीड जिल्ह्यात कधी काय होईल याचा नेम नाही. एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजला असून दुसरीकडे मनाला हलवून टाकणाऱ्या गुन्हेगारीच्या खळबळजनक घटना सुद्धा समोर येऊ लागल्या आहेत. केज तालुक्यातील बोरगाव येथे सख्या भावानेच मित्राच्या मदतीने आपल्या सख्या बहिणीचा खून केला असल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान केज पोलिसांनी मयताचा भाऊ व त्याच्या साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,केज तालुक्यातील बोरगाव बु.येथे आठ दिवसापूर्वी पुणे येथून पाडव्यानिमित्त आईला माहेरी  भेटायला आलेल्या बहिणीचा भावाने मित्राच्या मदतीने खून केल्याची खळबळ जनक घटना  मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी केज पोलिसात भावासह त्याच्या मित्रा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

‌पुणे येथून आईला केज तालुक्यातील बोरगाव येथे आईला पाडव्याच्या सना निमित्त शितल लक्ष्मण चौधरी वय २८ वर्ष ही तिच्या लहान मुलीला घेऊन बोरगाव येथे गावी आली होती  मंगळवारी मध्यरात्री तिचा भाऊ दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा.बोरगाव यांनी अज्ञात कारणावरून बहिणीच्या डोक्यात ,कपाळावर हत्याराने वार करून तिचा खून केला या प्रकरणी मयताच्या चुलत भाऊ नानासाहेब जालींदर गव्हाणे यांने दिलेल्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा.बोरगाव यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.दरम्यान घटनेची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या सह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रितसर पंचनामा केला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन करत आहेत.दरम्यान भावाने बहिणीचा खून का केला हे मात्र पोलिस तपासात निष्पन्न होईल अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली आहे.