बीड

वाढता संसर्ग कमी होण्याचे नाव घेईना; बाधितांचा आकडा आजही मोठा

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

21 April :- बीड जिल्ह्यात कोरोनाचे संकट दरदिवशी गडद होत चालले आहे. कोरोनाने बीड जिल्ह्याला चांगलाच फास आवळला आहे तरी बीडकरांना मात्र कोरोनाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर नागरिकांची जमा होणारी गर्दी तर गल्लो-गल्लीमध्ये जमत असलेला माणसांचा घोळका येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकते.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

आजही बीड जिल्ह्यात बाधितांचा आकडा 1046 वर पोहचला आहे. यामध्ये अंबाजोगाई, आष्टी,गेवराई आणि केज मध्ये शंभर पेक्ष्या जास्त रुग्ण असून बीडमध्ये मात्र दोनशेच्या वर रुग्ण आढळून आले आहेत . बीड जिल्ह्यातील 4576 रुग्णांची तपासणी केली असता 3529 रुग्ण निगेटिव्ह आहेत तर 1047 पॉझिटिव्ह आहेत.जिल्ह्यातील अंबाजोगाई मध्ये 176,आष्टी 124,बीड 223,धारूर 43,गेवराई 101,केज 125,माजलगाव 48,परळी 90,पाटोदा 51,शिरूर 35,वडवणी मध्ये 31 रुग्ण आढळून आले आहेत .