News

जिल्हा शल्यचीत्सक सूर्यकांत गीते म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा

धनु भाऊ तुमच्या जीवावर गीते उड्या मारत आहेत, त्यांना आवरा

बीड दि. २१ ( प्रतिनिधी ) जिल्ह्याचे शल्यचिकित्सक हे बीड येथे रुजू झाल्यापासून कायमच आपल्या निष्क्रिय कार्यक्षमतेमुळे चर्चेत राहिलेले आहेत. कोरोनाच्या संकट समयी सध्या या गीते महाशयांनी रुग्णालयात ठाण मांडून बसणे गरजेचे असताना देखील हे अकार्यतत्पर साहेब कार्यालयात कधीच उपस्थित नसल्याचे जाणवत आहे. विशेष करून मागच्या दोन दिवसात त्यांनी काही मोजका वेळ सोडला तर दवाखान्यापासून दूर राहणेच पसंत केले असल्याचे निदर्शनास येते. काल दिनांक 20 रोजी दुपारी रुग्णालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी जात आहे असे सांगून साहेब गेले ते आज दुपारी एक वाजेपर्यंत गीते यांनी रुग्णालयात पाय देखील ठेवला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अशा अधिकार्याबद्दल आता बोलावे तरी काय ? आणि तक्रार कोणाकडे करावी हा देखील एक प्रमुख प्रश्न आहे. त्यामागचे कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी यावेळी त्यांच्या विरोधात माध्यमांनी बातम्या छापल्या नंतर हेच गीते काही आरोग्य अधिकाऱ्यांन जवळ म्हणाले होते की, पालकमंत्री माझ्यासोबत आहेत, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही. आता जर पालक मंत्री गीत्तेंच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सोबत असतील तर खरच गीते साहेब तुमचे कोणीही काहीच करू शकत नाही.
डॉ. सूर्यकांत गीते मोठ्या हौसेने काही महिन्यांपूर्वी बीड येथे शल्य चिकित्सक म्हणून रुजू झाले. आल्यानंतर गीते थोडेफार चांगले काम करून दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, मात्र रुजू झाल्यापासून गीते यांचा कार्यकाळ हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. कोरोनाच्या एवढ्या संकटसमयी देखील गिते हे आपल्याच धुंदीत असल्याचे पाहायला मिळतात. केवळ एखादा वरिष्ठ अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी दवाखान्यात, कोविड वॉर्डात भेट द्यायला आला तरच गीते यांची त्या वॉर्डात चक्कर होत असते अन्यथा आपल्या दालनात बसूनच गीते हा पूर्ण आरोग्य व्यवस्थेचा गाडा कसाबसा ढकलत असतात तो देखील कसाबसा. गीते दवाखान्यात उपस्थित नसल्याने मेडिकल बिलाच्या फाईल, दवाखान्याच्या कामकाजाच्या संबंधित संचिका, रेमाडीसिवरसाठी दवाखान्यात गीते यांच्या सहीसाठी येणारे रुग्णांचे नातेवाईक आधी सर्वांचे मोठे हाल सध्या होत आहे.