बीड

बीडमध्ये कोरोना संक्रमणाचा वेग कायम; आज ‘इतक्या’ जणांना झाली बाधा

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

19 April :- बीड जिल्ह्यात कोरोनाचे संकट दरदिवशी गडद होत चालले आहे. कोरोनाने बीड जिल्ह्याला चांगलाच फास आवळला आहे तरी बीडकरांना मात्र कोरोनाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर नागरिकांची जमा होणारी गर्दी तर गल्लो-गल्लीमध्ये जमत असलेला माणसांचा घोळका येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकते.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

आरोग्य विभागाला आज दि.19 एप्रिल रोजी 4242 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 1121 जण बाधीत आढळून आले असून 3121 जण निगेटिव्ह आले आहेत.बाधीतांमध्ये अंबाजोगाई 212, आष्टी 198, बीड 161, धारूर 57, गेवराई 101, केज 87, माजलगाव 64, परळी 125, पाटोदा 41, शिरूर 34 आणि वडवणी तालुक्यात 28 रूग्ण आढळून आले आहेत.