तर मी कोरोनाचे जंतू फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते
फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये- आमदार संजय गायकवाड
18 April :- मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला. ते शनिवारी बुलडाण्यात बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. भरसभेत संजय गायकवाड यांची जीभ घसरली. त्यामुळे आता यावरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे.मात्र मात्र विरोधी पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे, असा आरोप बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
यावेळी त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला. केंद्रातील भाजपने राज्यसरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले. तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारवर टीका केली आहे.
कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला संजय गायकवाडांनी लगावला. जर का माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असे आवाहनही त्यांनी भाजपला केलं आहे. तसेच कोरोनाचें जंतू जर मला मिळाले असते तर देवेंद्रच्या तोंडात कोंबले असते , अशी टीका ही त्यांनी केली.