महाराष्ट्र

रुग्णाच्या नातेवाईकाने फोडली व्हेंटीलेटरची काच; कर्मचाऱ्यांना केली शिवागीळ

वृध्द महिलेच्या मृत्यूनंतर शासकिय रुग्णालयात घडली घटना

18 April :- हिंगोली येथील शासकिय रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये वृध्द महिलेच्या मृत्यू नंतर त्यांच्या नातेवाईकाने व्हेंटीलेटरची काच फोडली तसेच तेथील आरोग्य कर्मचारी व इतर रुग्णांच्या नातेवाईकांना शिवीगाळ केल्याचा प्रकार शनिवारी ता. 17 रात्री आकरा वाजता घडला आहे. या प्रकरणात आरोग्य कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही दिली आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील गयाबाई हिंगोले (70) या महिलेस ता. 8 एप्रील रोजी कोविडची लागण झाल्यामुळे शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचे वय जास्त असल्याने त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र व्हेंटीलेटरवर ठेऊनही त्यांच्या प्रकृतीत फरक पडत नव्हता तर त्या देखील उपचारासाठी प्रतिसाद देत नव्हत्या.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

दरम्यान, शनिवारी ता. 17 सायंकाळी त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली अन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकाने रात्री रुग्णालयात येऊन व्हेंटीलेटरची काच फोडली. त्यानंतर तेथे असलेल्या परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर आजू बाजूच्या रुग्णांच्या नातेवाईकांनाही शिवीगाळ केली. या प्रकरणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी रात्री साडे आकरा वाजता शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही केली आहे.

यामध्ये ज्या रुग्णांच्या नातेवाईकांना शिवीगाळ केली त्यांची नावेही यामध्ये नमुद केले आहे. या घटनेमुळे आरोग्य कर्मचारी व परिचारिकांमधून भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. शासकिय रुग्णालयातील कोविड वार्डमधील रुग्णाच्या मृत्यू नंतर त्यांच्या नातेवाईकाने हा प्रकार केल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाणार आहे.