बीड

बीड आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून शेकडो रुग्ण कोरोनामुक्त

वाचा सविस्तर, बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट्स

18 April :- बीड जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढत असला तरीही आरोग्य कर्मचाऱ्याच्या आथिर्क परिश्रमांमुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा प्रमाण वाढत आहे. निश्चितच ही गोष्ट बीडकरांना दिलासा देणारी आहे. आज शनिवारी तब्बल 687 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे. बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 86.15 टक्के इतका आहे सध्या बीड जिल्ह्यात 2988 बेड शिल्लक असून ऊन 4698 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

बीड जिल्ह्यात 93 ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करण्यात आली असून 7686 बेड बीड जिल्ह्यात आहेत, जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत बीड जिल्ह्यात आतापर्यंत 39 हजार 313 बाधित रुग्णांची संख्या असून यापैकी 33874 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. आता बीड जिल्ह्याचा पॉझिटिव रेट 11.65 टक्के इतका आहे जिल्ह्याची रुग्ण वाढ दिसत असली तरी करोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील समाधान कारक आहे आज पुन्हा नवीन 4 कोविड केअर सेन्टर रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.