बीड

बीड जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचा नवा आदेश

करण्यात येणार कठोर कारवाई

18 April :- कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढू लागल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन सुरू केला आहे. मात्र बीडकरांनी या लॉकडाऊन चक्क केराची टोपली दाखवली. भर लॉकडाऊनमध्येही बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. दरदिवसाला बीड जिल्ह्यात हजाराच्या पुढे रुग्ण बाधत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करत आज बीड जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी नवा आदेश काढत उद्या सोमवार 19 एप्रिलपासून बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

अत्यावश्यक सेवा केवळ सकाळी 7 ते 11 दरम्यान चालू राहणार असून फळविक्रेत्यांना सायंकाळी 5 ते 7 दरम्यान फळ विक्री करता येणार आहेत. या नव्या आदेशाची काटेकोरपणे अमलबजावणी करता येणार आहे. दि. 19 एप्रिलपासून बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवामध्ये येत असलेल्या किराणा, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीची दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. त्यानंतर या सर्व आस्थापना शंभर टक्के बंद असणार आहेत.

सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान हातगाड्यावर फिरून फळ विक्रेत्यांना फळ विक्री करता येणार आहे. लॉकडाऊनची अमलबजावणी करण्यात येणार असून विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या अथवा आदेशाचे उल्लंघन करत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दुकान उघडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.