कोरोनाचे संकट गडद; आजही रुग्णसंख्येत मोठी भर
काळजी घ्या, कोरोनाचा संसर्ग टाळा!
बीड जिल्ह्यात कोरोनाचे संकट दरदिवशी गडद होत चालले आहे. कोरोनाने बीड जिल्ह्याला चांगलाच फास आवळला आहे तरी बीडकरांना मात्र कोरोनाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर नागरिकांची जमा होणारी गर्दी तर गल्लो-गल्लीमध्ये जमत असलेला माणसांचा घोळका येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतो.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
आज रविवारी १८ एप्रिल रोजी आरोग्य विभागाच्या अहवालात ११४५ पॉझिटिव्ह आले आहेत. तर निगेटिव्ह ३५८०आले आहेत. आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई २१९, आष्टी १४९, बीड २७६, धारूर ३८, गेवराई ८९ केज १३१, माजलगाव ९१, परळी ५९, पाटोदा ४७, वडवणी १५ तर शिरूरमध्ये ३१ रुग्ण आढळून आले.