राज्यात कोरोनाचे महाभयंकर थैमान; आजही बधितांची संख्या उच्चांकी!
झुंजारनेता वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
17 April :- देशभरासह राज्यातील करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधिता आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ सुरू आहे. राज्यात सध्या १५ दिवसांची संचारबंदी सुरू आहे, मात्र तरी देखील रूग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत नाही. परिणामी राज्यात कडक लॉकडाउन जाहीर करण्याचेही मंत्र्यांकडून बोलले जात आहे.
आज दिवसभरात राज्यात ६७ हजार १२३ करोनाबाधित वाढले असून, ४१९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर १.५९ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ९७० रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
राज्यात आज रोजी एकूण ६,४७,९३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.दरम्यान, आज दिवसभरात ५६ हजार ७८३ रूग्ण बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,६१,१७४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८१.१८ टक्के एवढे झाले आहे.