महाराष्ट्र

बेड नाही हे उत्तर सहन करणार नाही- राजेश टोपे

राजेश टोपेंनी घेतला राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा

16 April :- राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी बेड न मिळणे, औषधं न मिळणे, ऑक्सिजन तुटवड्याच्या तक्रारी देखील येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यानंतर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, बेड मॅनेजमेंटसाठी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. बेडची संख्या वाढली पाहिजे. बेड नाही हे उत्तर सहन करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. आता 15 दिवस गॅप घेत आहोत. तर बेड वाढवले पाहिजेत. हॉस्पिटलमध्ये जागा नसेल तर चांगल्या इंस्टिट्यूटमध्ये बेड वाढवा. रुग्णालयांचे 80% बेड ताब्यात घेतले पाहिजेत.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

कोविड नियमावली बनवली पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असंही टोपे म्हणाले. ते म्हणाले की, खासगी रुग्णालयांचे ऑडिट चेक केलं पाहिजे. खासगी रुग्णालयांनी बिलं काढताना प्रोटोकॉल पाळणं आवश्यक आहे. तसेच चोवीस तासात टेस्टिंग रिपोर्ट आलाच पाहिजे हा दंडक आहे, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, सध्या होम आयसोलेशनवर भर आहे त्यामुळे संपूर्ण घर इन्फेक्ट होत आहे. प्रत्येकाची विचारपूस करून इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन केलं पाहिजे, असं टोपे म्हणाले.

टोपेंनी सांगितलं की, टास्क फोर्सने ऑक्सिजन आणि रेमडेसिविर वापर बाबत गाईडलाईन्स काढली आहे. डॉक्टर लक्षणं कमी असताना हे इंजेक्शन वापरत आहेत. कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले. ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात ते म्हणाले की, ऑक्सिजनचा योग्य वापर करावा. यासंदर्भात दोन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. खासगी हॉस्पिटल 50 बेडवरचं असेल तर ऑक्सिजन जनरेशन प्लांट लावले पाहिजे. त्यामुळे ते स्वावलंबी होतील.

अनेक रुग्णालय स्वतःचे प्लांट टाकत आहे. बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन दिलेले आहेत. भिलाई, तेलंगणा ,कर्नाटकमधून काही ऑक्सिजन सप्लायर देणार आहेत. तसेच जामनगरहून देखील ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन आणण्याचे नियोजन करत आहोत. रेमडीसीविर सुद्धा योग्य वापरलं पाहिजे. 50 हजार दररोज इंजेक्शन मिळायचे. आता 40 हजार मिळत आहेत. पण योग्य वापर केला तर यातही भागू शकेल. 21 पर्यंत सात कंपनीने सांगितलं आहे की, दुसरी बॅच येत आहे त्यात लाख भर राज्याला मिळतील असं ते म्हणाले.