बीड जिल्ह्यात कोरोना कहर आटोक्यात येईना
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!
16 April :- कोरोनाचा कहर सुरुच असून रोज बाधितांच्या आकड्यात वाढत होऊ लागली आहे. आज आलेल्या अहवालात बीड तालुक्यात सर्वाधिक ३४८ तर जिल्ह्यात १००५ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज ६७१ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
काल आरोग्य विभागाने जिल्हाभरातून ३६५५ संशयितांचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून यामध्ये तब्बल १००५ बाधित आढळून आले आहेत. तर २६५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई १४२ आष्टी १६८ बीड ३४८ धारुर २९ गेवराई ६७ केज ९८. माजलगाव ६० परळी २९ पाटोदा २१ शिरुर २१ वडवणी २२ आज ६७१ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.