महाराष्ट्र

राज्यात कोरोनाने थैमान; वाचा किती आढळले पॉझिटिव्ह रुग्ण

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

15 April :- राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 50 हजार पार करत आहे. आजही राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 60 हजार नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर 349 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे, कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

आज राज्यात 53,335 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. गेल्या काही दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. तर आजपर्यंत एकूण 29,59,056 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.3 एवढा झाला आहे. आज राज्यात 61,695 नवीन रुग्णांचे निदान झले आहे. तर आज 349 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 63 टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,30,26,652 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 36,39,855 (15.8 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 35,87,478 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 27,273 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज एकूण 6,20, 060 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.