महाराष्ट्र

परिस्थिती गंभीर! एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार

जागेअभावी 8 मृतदेहांचा अंत्यविधी उद्या

15 April कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती अतीगंभीर होताना दिसत आहे. उस्मानाबादच्या स्मशानभूमीत याची प्रचिती आली. उस्मानाबाद स्मशानभूमीत आज कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळालं. बुधवारी एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आले. तर 8 मृतदेहांवर उद्या अंत्यविधी करण्यात येणार आहे. हे चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या. उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत आज 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे 8 मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत. उस्मानाबादचे हे चित्र पाहून अनेकांना रडू देखील कोसळल्याचे पाहायला मिळाले.