बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; आजही रुग्णसंख्येत मोठी भर

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा सुरु असलेला हाहाकार सर्व सामन्यांचे जीवन विस्कळीत करू लागला आहे. बीड जिल्ह्यात २६ मार्च पासून लॉकडाऊन सुरु आहे. मात्र तरीही कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आटोक्यात येण्याचे काही चिन्ह दिसत नाहीत. बीड जिल्ह्यात दर दिवसाला सरासरी सातशेच्या पुढे कोरोना रुग्णसंख्येत भर पडत आहे. आज. प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात 963 कोरोनाबाधीत आढळून आले आहेत.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

काल 3799 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला होता. अंबाजोगाई, बीड, आष्टी याठिकाणी कोरोनाबाधीतांचा आकडा सर्वाधिक आहे. बीड जिल्ह्यातल्या कोरोनासेंटरमधून काल 3799 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आज दुपारी त्याचे अहवाल प्राप्त झाले असता 2836 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 963 जण कोरोनाबाधीत आढळून आले. अंबाजोगाई सर्वाधिक 230 कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आली असून आष्टी 116, बीड 167,धारूर 25, गेवराई 49, केज 106,माजलगाव 70, परळी 69, पाटोदा 59, शिरूर 43, वडवणी तालुक्यात 29 कोरोनाबाधीतांची नव्याने नोंद झाली आहे.