बीड

बीड जिल्ह्यात आज कोरोना सातशे पार

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर आटोक्यात येण्याचं कसलंही चिन्ह दिसून येत नाहीये. दररोज बीड जिल्ह्यात सरासरी सातशेपेक्षा अधिक जणांना कोरोना विषाणूची बाधा होत आहे. आरोग्य विभागाने काल दिवसभर बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून 4858 संशयीतांचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

अहवालामध्ये तब्बल 703 जण पॉझिटिव्ह तर 4155 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 239, आष्टी 90, बीड 112 , धारूर 10, गेवराई 24 , माजलगाव 19 ,परळी 68, केज 55 , पाटोदा 12 , शिरूर 62 तर वडवणीत 11 रुग्ण सापडले आहेत.