केसकर्तनालयाच्या दुकान मालकाने केली आत्मम्ह्त्या
गरिबीला वैतागून आत्महत्या करीत असल्याची लिहिली चिठ्ठी
11 April :- कोरोना रुग्णाचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमणात वाढत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. शासनाने घालून दिलेल्या लॉकडाऊनच्या नियमानुसार केसकर्तनालयाची दुकाने देखील बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, यामुळे अनेक दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातूनच एका केसकर्तनालयाच्या दुकान मालकाने आत्मम्ह्त्या केल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर आत्महत्या करणाऱ्या दुकानदाराने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी देखील लिहून ठेवली होती. त्यानुसार आर्थिक अडचणीला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
मनोज झेंडे असं आत्महत्या करणाऱ्या केसकर्तनालयाच्या दुकान मालकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहिली असून, या चिट्ठीत त्यांनी लिहिले आहे की, मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप घेऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे.दरम्यान, त्यांनी चिट्ठीत मी कोरोनाला आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. असं देखील म्हटलं आहे. आमची दुकाने बंद आहेत, आम्ही ५ हजार रुपयावर घर कसे चालवायचे अस देखील मनोज झेंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठीत लिहिले आहे.
मनोज झेंडे यांनी विषारी औषध पिऊन आपले आयुष्य संपविले आहे. मनोज झेंडे यांनी दुकाने बंद असल्याने केलेल्या आत्महत्येने सर्वत्र खळबळ उडाली असून, त्यांच्या पश्चात त्यांना २ मुले व १ मुलगी पत्नी असा परिवार आहे. उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार असताना त्यांचा मृत्यू झाला.मनोज झेंडे यांच्या आत्म्हत्येनंतर नाव्ही समाजातील सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी यांनी देखीलआत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. गेल्या ८ दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने केसकर्तनालयाचे दुकाने बंद करण्याचे आदेश काढले आहेत, त्यामुळे समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे, असं म्हटलं आहे.
याचा पहिला बळी उस्मानाबाद जिल्ह्यात गेला आहे. एकतर शासनाने आम्हाला कुठलिही मदत केलेली नाही. आमचा उदरनिर्वाह फक्त केसकर्तनालयाच्या दुकानावर आहे. मुलांचे शिक्षण आणि घरभाडे आणि दुकानभाडे हे कुठून द्यायचे असा सवाल सचिन चौधरी यांनी उपस्थित केला आहे. एकतर शासनाने आम्हाला दुकाने उघडायची परवानगी द्यावी नाहीतर आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. रोज रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बर असं देखील त्यानी म्हटलं आहे.