परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय?
पंकजा मुंडे यांचं व्टिट
11 April :- भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या टाळेबंदीच्या प्रस्तावावर जनतेचा विचार करून पॅकेज द्या. अशी भूमिका मांडली त्यानंतर वेगवेगळ्या भाजप नेत्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्याचे पहायला मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी टाळेबंदीमुळे उद्रेक होईल असा इशारा दिला. त्याचवेळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र फडणवीस याच्या परस्पर विरोधी मत मांडत टाळेबंदीला पर्याय काय ?असे व्टिट केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे स्वपक्षीय नेत्यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे दिसत आहे.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
टाळेबंदी लावताना गरिबांची, व्यापाराची अर्थव्यवस्थेची परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय आहे?? कोरोनाची साखळी कशी तोडणार? आरोग्य यंत्रणा वरील भार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. गरीब जनता, व्यापारी, छोटे व्यवसायिक, हातावर पोट असणाऱ्यांसाठी काही ठोस भूमिका घ्या, पॅकेज जाहीर करा तरच भाजप टाळेबंदीबाबत सकारात्मक विचार करेल असे मत कालच देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी मांडले. मात्र पंकजा मुंडे यांनी जरी गरिबांची, व्यापाराची परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय आहे? असा प्रश्न विचारला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव किती दिवस असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवस्था तत्काळ उभ्या कराव्या लागतील. जनतेची, व्यापाऱ्यांची भावना लक्षात घ्यायला हवी. मागील वर्ष वाया गेले. कर, वीज बिल, कर्जाचे हप्ते भरावे लागले. त्यामुळे जीवन जगायचे कसे असा प्रश्न जनतेसमोर आहे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडले होते.