भारत

देशात कोरोनाचा हाहाकार; ‘इतक्या’ रुग्णांनी आपला जीव गमावला

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

11 April :- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपला जोर कायम ठेवला असून शनिवारी एकाच दिवसात देशात कोरोनाच्या एक लाख 53 हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. देशात सलग सहाव्या दिवशी एक लाखाच्या वर कोरोना रुग्णांची भर पडल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 839 इतक्या रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

गेल्या 24 तासात 90,584 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्या आधी शुक्रवारी देशात एक लाख 45 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाच्या एकूण 25 कोटी 66 लाख 26 हजार चाचण्या झाल्या आहेत. शनिवारी एकाच दिवसात 14 लाख चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. देशात एक वेळ अशी होती की कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आले होते. पण पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पहायला मिळतंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.