महाराष्ट्र

‘इतक्या’ दिवसांचा लागू शकतो राज्यात लॉकडाऊन?

टास्क फोर्ससोबत बैठक सुरु

11 April :- राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं हाच पर्याय असल्याचं काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आज या संदर्भात टास्क फोर्ससोबत बैठक सुरु आहे. बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आठ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे लॉकडाऊन लावण्याच्या बाजूनं आहेत. तर कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा असं कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

ही बैठक अजून सुरु आहे. कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडीसीव्हीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे.

यात आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी. डॉ अविनाश सुपे, डॉ झहीर उडवाडिया, डॉ वसंत नागवेकर, डॉ राहुल पंडित, डॉ झहीर विराणी, डॉ ओम श्रीवास्तव, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित आहेत.