बीड

भर लॉकडाऊनमध्ये बीड जिल्ह्यात कोरोनाचे महाकाय थैमान

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद

11 April :- भर लॉकडाऊनमध्येही बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे महाकाय थैमान सुरु झाले असून मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात वाढला आज. कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या अंबाजोगाईत बाधित रुग्णांची अत्यंत वाईट स्थिती असून काल पासून आज सकाळपर्यंत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेणार्‍या बारा कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यात बीड रुग्णालयातील 3 मृत्यूचा समावेश आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

यातील आठ जणांचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला असून चार जणांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.आरोग्य विभागाने काल दिवसभर बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून 5681 संशयीतांचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून त्यामध्ये तब्बल 1062 जण पॉझिटिव्ह तर 4619 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई २२३, आष्टी १९३, बीड २२० , धारूर ३०, गेवराई ६४ , माजलगाव ३४ ,परळी ७५, केज १०६ , पाटोदा ५३ , शिरूर ४५ तर वडवणीत १९ रुग्ण सापडले.