महाराष्ट्र

मुख्यमंत्री साहेबांनी केली मराठा समाजाची फसवणूक

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

10 April :- राज्यव्यापी ठिय्या आंदोलन साष्टपिंपळगावच्या शिष्टमंडळात आणि मुख्यमंत्री साहेब यांच्यात पंधरा दिवसापुर्वी वर्षा निवासस्थानी मराठा समाजाच्या मुख्य मागण्या संदर्भात चर्चा झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की, मराठा आरक्षणासाठी शहिद झालेल्या कुटुंबाचे एकमत करा मी त्यांना शासकीय नोकरी देण्याचे तातडीने दोन दिवसात सुचना देवून आँर्डर करतो परंतु आज पंधरा दिवस उलटून गेले तरीही मराठा समाजाच्या कोणत्याच मागणीची दखल सरकारने घेतली नाही म्हणून आज सकाळी १० वाजल्यापासून आम्ही स्थगित केलेले आमरण उपोषण सुरू केले आहे.


वर्षा निवासस्थानी या प्रमुख मागण्या विषयी मुख्यमंत्री साहेबांशी झाली…
१) मराठा आरक्षण हे मिळालेच पाहिजे.
२) मराठा आरक्षणासाठी शहिद झालेल्या कुटुंबियांला शासकीय नोकरीत घेण्यात यावे.
३) कोपर्डी खटला सुरू करण्यात यावा आणि जेष्ठ सरकारी वकील श्री, उज्ज्वलजी निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी.
४) सारथी संस्था सुरू करण्यात यावी आणि संस्थेला जागा आणि संस्थेचा कर्मचारी स्टाफ भरण्यात यावा.


५) कोपरा ता.जि. लातूर येथील अत्याचारग्रस्त तरूणीवरील अँटाँसिटी अँक्ट रद्द करून, त्या नराधम आरोपींना अटक करण्यात यावी.
६) कै. आण्णासाहेब पाटिल विकास महामंडळाला अध्यक्ष नियुक्त करण्यात यावा.
७) कोरोना काळात विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक फिस घेतलेल्या होत्या त्या परत करण्यात याव्यात.
८) आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्यात याव्यात.
९) विजय वडेट्टीवार यांच्यामुळे जो मराठा समाजात रोष निर्माण झाला आहे म्हणून त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश करावेत.


या विषयावर वर्षा निवासस्थानी महत्वाची सविस्तर चर्चा झाली होती, यावेळी आरोग्यमंत्री श्री, राजेश भैया टोपे हे समक्ष हजर होते आणि साष्टपिंपळगावचे शिष्टमंडळाला मुख्यमंत्री साहेबांनी वचन दिले होते की, मी आपल्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य करत आहे, येत्या दोन दिवसात मी रितसर आपणास लेखीपत्र पाठवतो आहे.परंतु सरकारने कोणतीही दखल घेतली नाही आणि मराठा समाजाच्या मागण्या विषयी मुख्यमंत्री यांनी समाजाची फसवणूक केली आहे म्हणून आम्ही आज राज्यव्यापी ठिय्या आंदोलन साष्टपिंपळगाव याठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आहोत.


यामध्ये मराठा आरक्षणासाठी शहिद झालेले ४२ बांधवांच्या वतीने एक शिष्टमंडळ आमरण उपोषणाला बसले आहे, त्यामध्ये श्री, आण्णा शिवाजी काटे, पिंपळनेर… श्री, माणिक गोपीनाथ कदम, पाटेगाव हे कुटुबिय बसले आहेत आणि साष्टपिंपळगाव राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाच्या वतीने श्री, मनोज जरांगे पाटिल… मुक्ताबाई ढेपे… श्री, रावसाहेब सुळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

यावेळी बोलताना बलिदान देणार्‍या कुटुंबियांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, सरकारने आमच्या मागण्या ३ वर्ष का निकाली काढल्या नाहीत जर सरकारने मागेच शासकीय नोकरी दिल्या असत्या तर आमच्यावर आमरण उपोषण करण्याची वेळच आली नसती अशी संतापजनक प्रतिक्रिया शहिद मुलाचे वडील श्री, माणिक कदम दिली आहे आणि शहिद वडिलांचा मुलगा श्री, आण्णा काटे यांनी दिली आहे.जोपर्यंत मागण्या पूर्ण मंजूर केल्या जात नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण आता मागे घेतले जाणारच नाही असा गंभीर इशाराच मनोज जरांगे पाटिल यांनी दिला आहे.