हुरहुन्नरी कलाकार,निर्माता काळाच्या पडद्याआड
मराठी सिनेसृष्टीतील हुरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. अभिनेता, नाट्य दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते अशी ओळख असलेल्या गिरीश साळवी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले, ते ५५ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. मुंबईतील वरळीस्थित घरीच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पहिला राजा, समाधी, बाप हा बापच असतो, जाता नाही जात, बुद्धीबळ ही त्यांची रंगभूमीवर गाजलेली नाटकं होती.अभिनेता गिरीश साळवी यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियावरुनच त्यांना श्रद्धांजली वाहिली.