महाराष्ट्रात लागणार 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन?
महाराष्ट्र सरकार कडक लॉकडाऊनच्या तयारीत
9 April :- राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत असून, शेकडोंच्या संख्येने मृत्यू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली. त्यात लॉकडाऊन बाबत मत जाणून घेण्यात आले.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
याबाबत बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे, कोरोनाची ही शृंखला तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक आहे. आज मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हाच मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे.
येत्या तीन-चार दिवसात त्यासंदर्भात निर्णय होईल. तीन आठवड्यांचा हा लॉकडाउन कडक स्वरूपाचा असायला हवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा द्यावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.