सिनेमा,मनोरंजन

कॅटरिनाला कोरोनाने घेरले

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

6 April :- दिवसेंदिवस बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. अभिनेते गोविंदा, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटी आतापर्यंत संक्रमित झाले आहे. यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. अभिनेत्री कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टेट्सच्या माध्यमातून ही माहिती दिली. अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी त्वरित स्वत: ला वेगळं केलं आहे आणि मी होम क्वॉरंटाईन होणार आहे.

” ती म्हणाली, की “मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. मी माझ्या संपर्कातील सर्व लोकांना आवाहन करते की त्यांनी त्वरित चाचणी करुन घ्या. आपलं प्रेम आणि पाठींब्याबद्दल धन्यवाद. सुरक्षित राहा आणि स्वत: ची काळजी घ्या. ” देशात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत, अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली.

अलीकडच्या काळात अक्षय कुमार, आमिर खान, आलिया भट्ट, आर माधवन, रणबीर कपूर, चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गायक आदित्य नारायण पत्नी श्वेता अगरवाल, अभिनेत्री भूमी पेडणकर, विक्की कौशल, कॉमेडीयन कुणाल कामरा, शशांक खेतान, मनोज बाजपेयी, यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांना कोरोनाची लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.