बीड

कोरोनाचे थैमान! बीड जिल्ह्यात कोरोनाबधितांची विक्रमी नोंद

काळजी घ्या , कोरोना संसर्ग टाळा!

6 एप्रिल :- बीड जिल्ह्याचे लॉकडाऊन शिथिल होताच केवळ एक दिवसातच कोरोना बधितांची विक्रमी नोंद झाली आहे यामुळे नक्कीच आता बीड जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. काल जवळपास सहाशेच्या घरात रुग्णसंख्येची नोंद झाली तर आज कोरोना रुग्णसंख्येने थेट सातशेचा आकडा ओलांडला आहे.

झुंजारनेता वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सएप्प ग्रुप

कडक निर्बंध असतानाही आज बीड जिल्हावासी रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहे यावरून नक्कीच नागरिकांना कोरोनाचे भय राहिले नाही असे दिसून येत आहे. 2237 अहवालापैकी तब्बल 716 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर केवळ बीड शहरात 131 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

आष्टी- 98, अंबाजोगाई- 161, धारूर-29, गेवराई- 43, केज-64, माजलगाव-34, परळी-88, पाटोदा- 31, शिरूर-31 तर वडवणी येथे 6 कोरोना रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोरोना विषयक नियमावली पालन करणे अत्यावश्यक आहे.