दर शनिवारी, रविवारी बीड जिल्हा ‘लॉक’
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचा नवा आदेश
5 April :- बीड जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच फास आवळा आहे. लॉकडाऊन शिथिल होताच बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने पाचशेचा आकडा ओलांडला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने ५ एप्रिलच्या मध्यरात्री पासून मेडिकल, किराणा,भाजीपाला वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!
सदरील हे आदेश सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून ते ३० एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. यादरम्यान प्रवासी वाहतूक ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सुरु राहणार आहेत. काल महाराष्ट्र शासनाच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत.