महाराष्ट्र

सकाळच्या वेळी जमावबंदी

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

4 April :- कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता राज्यात आता सकाळच्या वेळीसुद्धा जमावबंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करण्यासोबतच सकाळच्या वेळीसुद्धा अत्यावश्यक आणि वैद्यकिय सेवा वगळता इतर बहुतांश गोष्टी बंद असतील अशी माहिती त्यांनी दिली.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

दुकानं, मार्केट आणि मॉल येथे अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळता इतर सर्वकाही बंद असेल. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे सुरु राहणार आहे. यासाठी कोणतीही बंधनं नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. निर्बंधांचं पालन न केल्यास दंड आकारण्यात येणार आहे. सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात यावी. यातून बँकिंग, अत्यावश्यक सेवा इत्यादींना मात्र वगळण्यात आलं आहे.