सुखद बातमी,बीड मधील दोन कोरोना रुग्णांना वाजत गाजत डिस्चार्ज
बीड जिल्हात कोरोना रुग्नाची वाढत चालली संख्या जिल्हावासीयांना चिंतेत टाकत असतानाच बीड आरोग्य प्रसाशनाच्या ,डॉक्टर ,कर्मचाऱयांच्या प्रयत्नातून आज एक सुखद बातमी आली असून दोन कोरोना बाधित रुग्ण बीड जिल्हा रुग्नालयातून बरे होऊन आज घरी परतले
गेवराई तालुक्यातील इटकर येथील १४ वर्षीय मुलगी व माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील इसम गेल्या दहाबारा दिवसापासून बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते . रोज जिल्हात रुग्ण वाढत असताना आज मात्र दोन कोरोना बाधित रुग्ण बरे झाले तेव्हा आरोग्य प्रशासनाने आज या दोघांच्या हाताने केक कापून पोलीस बँडपथका च्या सलामी तुन त्यांना घरी पाठवले या वेळी जिल्हारुग्नालय प्रमुख डॉ अशोक थोरात ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पवार डॉ सुखदेव राठोड ,डॉ जयश्री बांगर यांच्या सह आदी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.