महाराष्ट्र

परिस्थिती गंभीर; राज्यात आजही कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

4 April :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनारुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यातील प्रशासनानं अखेर काही कठोर निर्बंधही लागू केले. शिवाय नागरिकांनी या निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहनही शासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थितीमुळं कठोर निर्बंध नव्यानं लागू करण्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच राज्यातील कोरोनाबाधितांचा दिवसभरातील आकडा आरोग्य विभागानं प्रसिद्ध केला.

यामध्ये 24 तासात तब्बल 57,074 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नव्यानं कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची ही संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत.

राज्यात मागील 24 तासांत कोरोनामुळं 222 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 27508 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. राज्यात सध्याच्या घडीला गृह लिवगीकरणात आणि संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. त्यामुळं आता आरोग्य सुविधा पुरवण्यावर रुग्णांना पूर्ण आणि योग्य उपचार देण्यावरच प्रशासनाचा भर असणार आहे.