महाराष्ट्र

लॉकडाऊन निर्णया बाबत फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्य सरकारच्या निर्णयाला आमचा पाठींबा- फडणवीस

4 April :- राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन दिवसांचं विकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी अंशतः लॉकडाऊन जाहीर केलं आहे. या निर्णयाला आमचा पूर्णपणे पाठींबा आहे. राज्य सरकारच्या नियमांचे लोकांनी पालन करावे असे आम्ही आवाहन करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनाही मी आवाहन करतो की त्यांनी पाहिजे तिथे सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

राज्यात सध्या रुग्णालयात खाटांची कमतरता भासत आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरही सरकारने लक्ष द्यावे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांचे खूप हाल होणार आहे. त्यामुळे या सर्व घटकांसाठी सरकारने काहीतरी तरतूद करावी, सोबतच यासाठी बैठक घ्यावी असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठीही सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.

यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत करण्याचेही त्यांनी आवाहन केलं. मधल्या काळात राज्य सरकार गाफिल राहिल्याने ही वेळ आली असल्याची टीकाही फडवणीस यांनी केली. राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दरवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचाही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्राने राज्याला भरपूर मदत केली असून मी यापूर्वीच त्याची सविस्तर माहिती दिली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.